Latest Bollywood News Update | अखेर Padmavat या चित्रपटाला मुहूर्त मिळाला पहा काय आहे बातमी

2021-09-13 1

या चित्रपटाला करणी सेना संघटना, तसेच काही राजकीय पक्षांनी विरोध केल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे नाव बदलण्याची सूचना केली होती. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या आवश्‍यक बदलानंतर चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले जाईल, असेही सांगण्यात आले होते. या चित्रपटातील "घुमर...' गाण्यामध्येही बदल करण्याचा; तसेच चित्रपट दाखवण्यापूर्वी सतीच्या प्रथेला पाठिंबा नसल्याबाबतचे सूचनापत्र दाखवण्यात यावे, अशा सूचना या सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. त्यानंतर भन्साळी यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची तयारी दर्शवली होती. या चित्रपटाचे नाव बदलून चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले असून, तो 25 जानेवारीला प्रदर्शित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires